कोलंबो
कोलंबो : श्रीलंकेची (सीलोन) राजधानी, उत्कृष्ट कृत्रिम बंदर व गजबजलेले व्यापारी केंद्र. लोकसंख्या ५,६२,१६०(१९७१); उपनगरांसह ७,६३,०६४ (१९६३). हे पश्चिम किनाऱ्यावर केलानी नदीमुखाशी वसले आहे. येथील हवामान उष्ण व दमट असून कमाल व किमान तपमानात फरक थोडा आहे. येथे पाऊस सरासरी २३० सेंमी. पडतो. डिसेंबर ते फेब्रुवारी हवा आल्हाददायक असते.